
नांदेड – छत्रपती संभाजीराजे (sambhaj raje) यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. संभाजीराजे यांनी स्वत: ची संघटना स्थापन करून अपक्ष म्हणून राज्यसभा खासदारकीची निवडणूक (Rajya Sabha MP eleaction ) लढवणार अशी घोषणा केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी संभाजीराजे यांना पाठिंबा देण्याबाबत होकार दर्शवला आहे. शिवसेना आणि काँग्रेसही त्यांना पाठिंबा देण्यासाठी पुढे येतील, असे वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.
संभाजीराजे यांनी येत्या राज्यसभा निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून अर्ज दखल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याकरिता संभाजीराजे यांना अर्ज दखल करण्यासाठी १० अनुमोदक आमदारांची व निवडून येण्यासाठी एकूण ४२ आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे.
याकरिता अनुमोदन देण्यासाठी संभाजीराजे यांनी अपक्ष आमदारांना साद घातली आहे, तर या निवडणुकीमध्ये विजयी होण्यासाठी कोणत्याच पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे त्यांनी ही जागा आपल्याला अपक्ष म्हणून देण्यात यावी, अशी जाहीर मागणी केलेली आहे.
दरम्यान या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना नांदेडमध्ये पत्रकार परिषदेत छत्रपती संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा देणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
शरद पवार संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीवर स्पष्ट भूमिका व्यक्त करत म्हणाले, “राज्यसभेचा निकाल प्रत्येक पक्षाची किती ताकद यावर अवलंबून आहे. आम्ही महाविकास आघाडीमधील इतर पक्षांशी अद्याप चर्चा केलेली नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरतं सिमीत मी सांगतो, राज्यसभेमध्ये आमचा एक सदस्य निवडून यायला कोणतीही अडचण नाही. त्याची मतांची गरज भागून राष्ट्रवादीकडे १०-१२ मतं जादा शिल्लक राहतात. असं शरद पवार म्हणाले आहेत.