ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने Ricky Ponting फिरकीपटू शेन वॉर्नला Shane Warne भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली असून, तो इंग्लंडचा प्रशिक्षक असता तर त्याच्या खेळातील अफाट ज्ञानामुळे त्याने आपली भूमिका चोख बजावली असती, असे म्हटले आहे. अॅशेसमध्ये ऑस्ट्रेलियाकडून 0-4 असा मानहानीकारक पराभव झाल्यानंतर इंग्लंडने मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड यांची त्यांच्या पदावरून हकालपट्टी केली होती. थायलंडमध्ये वॉर्नच्या आकस्मिक निधनाच्या काही आठवड्यांपूर्वी वॉर्नने इंग्लंडचे प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली होती. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम या महान फिरकीपटूच्या नावावर आहे. वॉर्नने कसोटीमध्ये 708 आणि वनडेमध्ये 293 विकेट घेतल्या आहेत.
रिकी पॉन्टिंगने ‘द आयसीसी रिव्ह्यू’मध्ये ईशा गुहाला सांगितले की, ‘वॉर्नची आवड आणि खेळाचे ज्ञान आश्चर्यकारक होते. उत्तम प्रशिक्षक होण्याचे सर्व गुण त्याच्यात होते. जर वॉर्नसारखा कोणी इंग्लंड क्रिकेट संघात सामील झाला असता तर मला वाटते की त्याने चांगले काम केले असते.
A brave interview from Ricky Ponting as he remembers Shane Warne – watch the full tribute here ➡️ https://t.co/OcEz4CWiCX pic.twitter.com/iLKJPrp8ua
— ICC (@ICC) March 7, 2022
तो म्हणाला, ‘हे क्रीडा जगताचे मोठे नुकसान आहे. त्याने काही कोचिंग केले असेल किंवा तो ज्या पद्धतीने बोलायचा, ज्या गोष्टी तो आपल्या कॉमेंट्रीद्वारे आम्हाला सांगायचा, मला वाटते की आपण सर्वजण त्याची आठवण काढू.’ वॉर्नने त्याच्याशी झालेल्या चर्चेत इंग्लंडचा प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली होती, असे गुहा यांनी यापूर्वीच सांगितले होते.