क्रिकेट विश्वातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. फिरकीचा जादूगार अशी ओळख मिळवलेला ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज शेन वॉर्न Shane Warne passes away यांचं वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. जगातील क्रीडा जगताला हादरवणारी अशी ही बातमी आहे.
ऑस्ट्रेलियाच्या या महान गोलंदाजाने २००७ मध्ये क्रिकेटला अलविदा केला होता. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये १००० बळींचा टप्पा गाठणारा शेन वॉर्न हा जगातील दुसरा गोलंदाज आहे. या यादीमध्ये मुथय्या मुरलीधरन पहिल्या क्रमांकावर आहे. शेन वॉर्नच्या नावावर कसोटीमध्ये ७०८ तर वनडेत २९३ विकेट्स घेण्याचा विक्रम आहे.
Former Australian Cricketer Shane Warne dies of ‘suspected heart attack’, aged 52, says Fox Sports pic.twitter.com/cgocTvhLCC
— ANI (@ANI) March 4, 2022
क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम लेगस्पिनर म्हणून शेन वॉर्नला ओळखले जायचे. जगातील क्रिकेट इतिहासात शेन वॉर्न हा महान गोलंदाजांपैकी एक होता. 1992 मध्ये शेन वॉर्नने भारतीय संघाविरुद्ध सिडनीच्या मैदानात आपला पहिला कसोटी सामना खेळला होता. तर २००७ मध्ये सिडनीच्याच मैदानात इंग्लंडविरुद्ध शेन वॉर्नने शेवटचा कसोटी सामना खेळला होता.