
T20 World Cup: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी जखमी जसप्रीत बुमराहच्या जागी संघाची घोषणा केली आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी टी-20 विश्वचषकात बुमराहची जागा घेणार आहे. यासह मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांना राखीव खेळाडूंच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. टी-20 विश्वचषकासाठी बीसीसीआयने आपल्या अंतिम 15 खेळाडूंची यादी आयसीसीकडे पाठवली आहे.
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच जसप्रीत बुमराह पाठदुखीमुळे टी-20 वर्ल्डकपमध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. बुमराहच्या जागी मोहम्मद शमीचे नाव आघाडीवर होते. पण मोहम्मद शमीच्या मॅच फिटनेसवर प्रश्नचिन्ह होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी शमी कोविड पॉझिटिव्ह आढळला होता. यानंतर शमीला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्या फिटनेसवर काम करावे लागले आणि त्याला दोन दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाला जाण्याची परवानगी मिळाली.
🚨 NEWS 🚨: Shami replaces Bumrah In India’s ICC Men’s T20 World Cup Squad. #TeamIndia | #T20WorldCup
Details 🔽https://t.co/nVovMwmWpI
— BCCI (@BCCI) October 14, 2022
बीसीसीआयने आपल्या राखीव खेळाडूंच्या यादीतही दोन बदल केले आहेत. मोहम्मद शमीचा मुख्य संघात समावेश करण्याव्यतिरिक्त दीपक चहर दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाला जाऊ शकला नाही. त्यामुळे राखीव खेळाडूंचे दोन स्लॉट रिकामे होते. आता राखीव खेळाडूंच्या यादीत मोहम्मद शमीच्या जागी मोहम्मद सिराजला स्थान देण्यात आले आहे. तर शार्दुल ठाकूरच्या जागी दीपक चहरचा समावेश करण्यात आला आहे.
याशिवाय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 15 खेळाडूंच्या यादीत कोणताही बदल केलेला नाही. आयसीसीच्या परवानगीने 15 ऑक्टोबरपर्यंत विश्वचषकासाठी संघ बदलला जाऊ शकतो. बीसीसीआयने विश्वचषकासाठी 15 खेळाडूंची अंतिम यादी 14 ऑक्टोबरलाच आयसीसीकडे पाठवली आहे.