
भारताने एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव करत मालिका 3-0 अशी खिशात घातली. टीम इंडियासाठी वेस्ट इंडिजमध्ये हा मोठा विजय होता. या पराभवासह वेस्ट इंडिजच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची भर पडली. एकदिवसीय सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजने सलग 9 सामने गमावले आहेत आणि हे त्यांचे सलग दुसरे सर्वाधिक सामने आहेत. याआधी 2005 साली वेस्ट इंडिज संघ सलग 11 वेळा पराभूत झाला होता.
त्रिनिदाद येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 225 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ 26 षटकांत केवळ 137 धावा करू शकला. टीम इंडियाने हा सामना 119 धावांनी जिंकला. वेस्ट इंडिजचा हा सलग 9वा वनडे पराभव होता. यापूर्वी 2005 मध्ये त्यांना 11 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला होता. तर 1999 ते 2000 या कालावधीत वेस्ट इंडिजला सलग 8 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला होता.
वेस्ट इंडिजसाठी सलग सर्वाधिक एकदिवसीय पराभव
- फेब्रुवारी-ऑगस्ट 2005 दरम्यान 11 सामन्यांत पराभव
- जून-जुलै 2022 दरम्यान 9 सामन्यांमध्ये पराभव
- ऑक्टोबर 1999 ते जानेवारी 2000 दरम्यान 8 सामन्यात पराभव
- जुलै 2009 ते फेब्रुवारी 2010 दरम्यान 8 सामन्यात पराभव