NEET EXAM 2022: केरळमध्ये तपासणीच्या नावाखाली लज्जास्पद कृत्य, परीक्षेसाठी आलेल्या मुलींचे अंतर्वस्त्र काढले!

नेशनल एलिजिबिलिटी कम एंट्रेंस टेस्ट (NEET) परीक्षेदरम्यान केरळमधील कोल्लममध्ये एक लाजिरवाणी बाब समोर आली आहे. मार्थोमा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथे असलेल्या परीक्षा केंद्रावर तपासणीच्या नावाखाली विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे काढून घेतल्याचा आरोप आहे. या संदर्भात विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
त्याचवेळी, गोंधळ वाढल्यानंतर मार्थोमा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने या घटनेचा इन्कार केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तक्रार दाखल केल्यानंतर मुलीच्या वडिलांनी सांगितले की, ‘माझ्या मुलीला सांगण्यात आले की मेटल डिटेक्टरमध्ये अंडरगारमेंटचा हुक सापडला आहे, त्यामुळे तिला ते काढावे लागले. जवळपास 90 टक्के विद्यार्थिनींचे अंतर्वस्त्र काढून स्टोअर रूममध्ये ठेवण्यात आले होते.