
आजच्या तरुण पिढीमध्ये लैंगिक शिक्षण आणि सुरक्षित सेक्सबाबत जागरूकता वाढतेय, असं जरी वाटत असलं, तरी कंडोम वापरण्याबाबत अजूनही संकोच आणि गैरसमज दिसून येतात. विशेषतः पहिल्या संबंधादरम्यान किंवा नवख्या नात्यांमध्ये कंडोमचा उल्लेखही “गंभीर” विषय मानला जातो.
समाजातल्या गुप्ततेची भावना
कंडोम हे आपल्या समाजात अजूनही “लपवून ठेवायचं” प्रॉडक्ट मानलं जातं. मेडिकल दुकानात मागताना संकोच वाटतो, इतर कोणी ऐकू नये म्हणून हळू आवाजात विचारलं जातं. अशा वातावरणामुळे तरुणांमध्ये एक नैसर्गिक संकोच तयार होतो.
लैंगिक आरोग्य ही लपवायची गोष्ट नाही. कंडोम वापरणं म्हणजे जबाबदारीनं वागणं, याचं भान मुला-मुलींना लहान वयातच दिलं गेलं पाहिजे.
२. लैंगिक शिक्षणाचा अभाव
अनेकांना शालेय वयात लैंगिक शिक्षण व्यवस्थित मिळालेलं नसतं. त्यामुळे कंडोमचा उद्देश, त्याचा योग्य वापर, आणि गर्भधारणा तसेच लैंगिक रोगांपासून संरक्षण कसं होतं – हे सर्व माहिती नसतं.
वयात येणाऱ्या मुला-मुलींना वैज्ञानिक आणि खुलेपणानं लैंगिक शिक्षण दिलं गेलं पाहिजे.
३. “मजा कमी होते” हा गैरसमज
काही तरुणांचा समज असतो की कंडोम वापरल्याने “फीलिंग” कमी होतं किंवा आनंदात घट होते. हा एक प्रचलित गैरसमज आहे.
सध्याचे आधुनिक कंडोम विविध प्रकारात येतात – अल्ट्रा थिन, टेक्सचर्ड, वॉरमिंग इफेक्ट वगैरे. योग्य प्रकार निवडल्यास यौन अनुभवात कोणतीही बाधा येत नाही.
४. जोडीदाराला भीती वाटणे
कधी कधी पुरुष किंवा स्त्री – दोघांपैकी कोणालाही कंडोम सुचवणं म्हणजे समोरच्यावर “शंका घेतली” असं वाटू शकतं. “तू दुसऱ्यांशी झालयंस का?” असा प्रश्न मनात येतो.
नातं पारदर्शक आणि विश्वासाचं असायला हवं. कंडोम वापरणं म्हणजे शंका नाही, तर सुरक्षिततेसाठीचा परिपक्व विचार आहे, हे समजून घ्यायला हवं.
५. सहज उपलब्धता नसणे
आजही काही ग्रामीण किंवा निमशहरी भागांत कंडोम सहज मिळत नाहीत. तिथं ही चर्चा करणंही जड जातं.
डिजिटल प्लॅटफॉर्म, हेल्थ अॅप्स किंवा NGO यांच्यामार्फत घरपोच कंडोम सेवा सुरू झाल्यामुळे ही अडचण दूर करता येते.
कंडोम म्हणजे जबाबदारी
कंडोम वापरणं म्हणजे लैंगिक आरोग्याचं भान आणि जोडीदाराबाबत आदर राखणं. लाज किंवा गोंधळ न करता, याकडे परिपक्व दृष्टीकोनातून बघणं गरजेचं आहे.