शंभूराजे देसाई यांना कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली माहिती

WhatsApp Group

मुंबई – शिवसेनेकडून महाविकास आघाडीत राज्यमंत्री असलेले शंभूराजे देसाई राज्यातील सत्तासंघर्षाच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सहभागी झाले आहेत. सुरतला पहिले पोहचणार्‍यांमध्ये शंभूराजे होते. सध्या शंभुराजे देसाईं यांना कोरोनाची लागण झाली आहे. देसाईं यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. सोबतच आपण मुंबईतील शासकीय निवासस्थानी होम क्वारंटीन असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

‘मला आज कोरोनाची लागण झाली आहे. मी सुरूची या मुंबई येथील माझे शासकीय निवासस्थानी गृह विलगीकरणात उपचार घेत आहे. माझी प्रकृती चांगली असून डॉक्टरांचे म्हणण्यानुसार काळजी चे कोणते‍ही कारण नाही’ अशी माहिती त्यांनी ट्वीट करत दिली आहे.