T20 World Cup 2022 IND vs BAN Match: T20 विश्वचषक 2022 मध्ये टीम इंडिया 2 नोव्हेंबरला बांगलादेश विरुद्ध चौथा सामना खेळणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना अॅडलेडमध्ये होणार आहे. या सामन्यापूर्वी बांगलादेश संघाचा कर्णधार शकीब अल हसनने असे वक्तव्य केले आहे ज्यामुळे संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का बसला आहे.
साकिबचे अजब विधान
भारताविरुद्ध खेळल्या जाणार्या सामन्यापूर्वी शाकिब अल हसनने आपली टीम टी-20 विश्वचषक जिंकण्यासाठी आली नसल्याचं म्हटलं आहे. शाकिब अल हसन म्हणाला, ‘आम्ही इथे टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आलो नाही. टीम इंडिया इथे जिंकण्यासाठी आली आहे. एकीकडे जिथे सर्व संघ ही स्पर्धा जिंकण्यासाठी खेळत आहेत, त्याच दरम्यान शाकिबच्या या वक्तव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
T20 विश्वचषक 2022 च्या सुपर 12 मध्ये टीम इंडियाने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत, तर बांगलादेशने देखील 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. ग्रुप 2 मध्ये बांगलादेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. अशा स्थितीत बांगलादेशचा संघही उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित करू शकतो. मात्र, टीम इंडियाला पराभूत करणे बांगलादेशसाठी सोपे असणार नाही.
टीम इंडियाचा वरचष्मा
टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 11 सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियाने यापैकी 10 सामने जिंकले आहेत, तर बांगलादेशने फक्त 1 सामना जिंकला आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर या सामन्यात टीम इंडियाचे पारडे जड असणार आहे.