BPL 2023: आधी ओरडला, नंतर बॅटने…शाकिब अल हसन पुन्हा एकदा अंपायरशी भिडला

WhatsApp Group

बांगलादेशचा एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार शकिब अल हसन हा खेळापेक्षा कमी, वादांपेक्षा जास्त चर्चेत असतो. या स्टार अष्टपैलू खेळाडूने पुन्हा एकदा मैदानावर असेच काहीसे कृत्य केले आहे. बांगलादेश प्रीमियर लीगच्या एका सामन्यादरम्यान ही घटना घडली. अंपायरच्या निर्णयाने शाकिब इतका संतापला की, आधी तो अंपायरवर जोरात ओरडला आणि नंतर बॅट घेऊन त्यांच्या दिशेने जाऊ लागला. मात्र, कसेबसे प्रकरण निवळले. ही काही पहिली वेळ नाही, जेव्हा शाकिबने मैदानावर असे कृत्य केले आहे, अनेकवेळा तो मैदानावर आपला संयम गमावताना दिसला आहे.

बांगलादेश प्रीमियर लीगच्या तिसऱ्या सामन्यात फॉर्च्यून बारीशालचा सामना सिल्हट स्ट्रायकर्सशी झाला. शाकिब यावेळी फॉर्च्यून बारीशालकडून खेळत आहे. या सामन्यात त्यांच्या संघाने 194 धावा केल्या. यानंतरही फॉर्च्यून बारीशाल 6 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. शाकिबची शानदार खेळीही बारीशालचा पराभव टाळू शकली नाही. सामन्याच्या निकालापेक्षा शाकिबने फलंदाजीदरम्यान काय केले हे चर्चेत आहे.  शाकिबने काय केले आणि तो अंपायरवर का रागावला. जाणून घेऊया. Dhoni-Virat-Rohit की Gambhir, आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी कर्णधार कोण? जाणून घ्या…

या सामन्यात फॉर्च्युन बारीशालने प्रथम फलंदाजी केली. डावातील 16 वे षटक चालू होते. स्ट्रायकर्सचा वेगवान गोलंदाज रेझूर रहमान गोलंदाजी करत होता. शाकिब अल हसन स्ट्राइकवर होता. राजूरने त्याच्या षटकातील चौथा चेंडू बाऊन्सरने टाकला. हा चेंडू डोक्यावरून गेल्याचे शाकिबला वाटले. या चेंडूला नो बॉल किंवा वाइड द्यावा, असं अंपायरला वाटलं नाही. त्यांनी हा चेंडू लीगल ठरवला.  एवढ्यावरच शाकिबला राग आला आणि लेग अंपायरला बघून तो जोरात ओरडला. यानंतर तो बॅट घेऊन अंपायरच्या दिशेने गेला आणि जोरात ओरडला आणि वाईड न देण्याचे कारण विचारले. पण, पंच आपल्या निर्णयापासून हटले नाहीत.