धक्कादायक! पुण्यातून तब्बल 10 लाखांचे Sex Toys जप्त

WhatsApp Group

पुणे: विद्येचे माहेरघर मानलं जाणाऱ्या पुण्यामधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे पुण्यातील तरूणांना सेक्स टॉईजचं वेड लागलय का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरात आज 10 लाख रुपये किमतीचे सेक्स टॉईज (sex toys) जप्त करण्यात आले आहेत.

ही कारवाई लष्कर पोलिसांनाकडून करण्यात आली आहे. या प्रकरणी आता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका गोडाऊनमधून तबल 10 लाखांचे Sex Toys जप्त करण्यात आले आहे. या sex toys ऑनलाइन पद्धतीने विक्री सुरू होती. काही दिवसांपूर्वी पुण्यात सेक्सटॉर्शनमुळे दोन तरूणांना आत्महत्या करावी लागली होती. आता शहरात 10 लाख रुपये किमतीचे सेक्स टॉईज (sex toys) जप्त करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.