पिंपरी-चिंचवड – पोलिसांनी पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांनी एका लॉजवर चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे Sex racket in Pimpri-Chinchwad . या प्रकरणात पोलिसांनी ३ महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे. सुटका करण्यात आलेल्या महिलांमध्ये छत्तीसगडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन दलालांना अटक केली आहे. ताथवडे येथील साई लॉजवर पोलिसांनी ही कारवाई केली. चित्रपट अभिनेत्रीशिवाय सुटका करण्यात आलेली एक महिला मुंबईची तर दुसरी राजस्थानची आहे.
पिंपरी-चिंचवडमधील एका सेक्स रॅकेटमध्ये छत्तीसगडची एक प्रसिद्ध अभिनेत्री सहभागी असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी काही लोकांना बनावट ग्राहक बनवून पुणे-मुंबई रस्त्यावरील साई लॉजवर पाठवले. आरोपी पूर्णपणे जाळ्यात सापडल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून सेक्स रॅकेटचा धंदा चालवला जात होता. ज्यामध्ये अभिनेत्री आणि इतर महिलांवर जबरदस्ती केली जात होती. या महिलांकडून शरीरसंबंधाच्या बदल्यात प्रत्येक व्यक्तीकडून तीस ते पस्तीस हजार रुपये घेतले जात होते. आरोपी मोबाईलवर व्हॉट्सअॅपद्वारे मुलींना वेगवेगळ्या लॉजवर वेश्याव्यवसायासाठी पाठवत असे. या सर्व मुली त्याच्या नावाने खोल्या बुक करायच्या.
आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. जितेंद्र हस्तीमल बोकाडिया उर्फ हितेश हस्तीमलजी ओसवाल आणि हेमंत शाहू अशी त्यांची नावे आहेत. याशिवाय मुकेश केशवानी, करण, युसूफ उर्फ लंगडा शेख यांच्याविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.