
नागपूर – नागपूर शहरातील (Nagpur City) हुडकेश्वर पोलिस स्टेशनच्या हद्दीत सेक्स रॅकेटचा (Sex Racket) भंडाफोड झाला आहे. नागपूर पोलिसांच्या (Nagpur Police) गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा शाखेने (Crime Branch Social Security Team) ही धडक कारवाई केली आहे. धक्कादायक म्हणजे एक सेवानिवृत्त अर्थात पेन्शनर महिला (Pensioner Woman) हे रॅकेट चालवत होती, अशी माहिती तपासामधून समोर आली आहे.
रेखा उर्फ अनिता पाचपोर असं सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेचे नाव असून तिला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईनंतर पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका केली आहे. आरोपी महिला पतीची सेवानिवृत्त वेतन अर्थात पेन्शन घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी गोपनिय माहितीच्या आधारे नरसाळा मार्गावरील संत ज्ञानेश्वर नगरातील एका घरामध्ये छापेमारी करत हा धक्कादायक प्रकार समोर आणला आहे. प्रमुख सूत्रधार रेखा पाचमोर हिला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं आहे.
आरोपी रेखा पाचमोर हिचा गेल्या काही महिन्यांपासून गोरखधंदा सुरू होता. ती गरजू आणि गरीब तरुणी-महिलांना तिच्या जाळ्यामध्ये अडकवायची. त्यांच्याकडून देहविक्री करून घ्यायची. ग्राहकांकडून मिळणाऱ्या रकमेमधून निम्मी रक्कम स्वत: कडे ठेवायची आणि निम्मी रक्कम पीडित महिलांना द्यायची, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.