
लडाखमधील तुरतुक सेक्टरमध्ये भारतीय सैन्याची गाडी दरीत कोसळ्यामुळे ७ जवानांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर काही जवान जखमी झाले आहेत. या गाडीमध्ये एकूण २६ जवान प्रवास करत होते. जखमी जवानांना सर्वोत्तम उपचार मिळावे यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती सैन्यांच्या सुत्रांकडून देण्यात आली आहे.
#Tragic News Coming In
Seven Indian Army soldiers lost their lives so far in a vehicle accident in Turtuk sector (Ladakh), grievous injuries to others too.
26 soldiers were travelling from Transit Camp at Partapur to a forward location in Sub Sector Hanif. pic.twitter.com/8tjWNC4aus
— Defence Direct Education (@DefenceDirect) May 27, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ९ वाजता जवानांचा हा ट्रक परतपूर येथील ट्रांजित कॅम्पवरुन हानिफ सेक्टरकडे जात होता. जेव्हा हा ट्रक थोईसपासून २५ किलोमीटर दूर आला तेव्हा ट्रकचालकाचे अचानक नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक ५० ते ६० फूट खोल श्योक नदीत पडला. या अपघातामध्ये ७ जवानांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत.