दिशा सालीयन प्रकरणात राणे पिता-पुत्रांना मोठा दिलासा!

WhatsApp Group

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियनबाबत वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये आता मंत्री नारायण राणे Naranyan Rane तसेच भाजप आमदार नितेश राणे Nitesh Rane यांना दिंडोशी सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाकडून राणे पिता-पुत्रांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

त्यांच्याविरोधात मालवणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयाचे नितेश राणे यांनी स्वागत केलं आहे. यापुढेही जिथे अन्याय होणार तेथे आम्ही आवाज उठवणार असे राणे यांनी म्हटलं आहे.

नारायण राणे आणि मला दिशा सालीयन या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. काही अटीशर्तींवर आम्हाला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मी माननीय न्यायालयाचे आभार मानतो. लोकशाहीमध्ये लोकप्रतीनीधींना जो अधिकार दिला आहे, त्या अधिकाऱाला अबाधित ठेवण्याचं काम न्यायालयाने केलं आहे. महाविकास आघाडी सरकारनं षडयंत्र रचले, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला,” असं म्हणत नितेश राणे यांनी न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत केले आहे.