भीषण रस्ता अपघात; बस पुलावरून नदीत कोसळली, 31 जणांचा मृत्यू

WhatsApp Group

Mali Road Accident: आफ्रिकन देश माली येथे एका पुलावरून बस कोसळली. या अपघातात 30 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, तर 10 जण जखमी झाल्याची माहिती आहे. नदीवरील पुलावरून बस खाली पडल्याची घटना केनिबा परिसरात घडली.

या घटनेबाबत परिवहन मंत्रालयाने सांगितले की, मंगळवारी (27 फेब्रुवारी) मालीमध्ये 31 जणांचा मृत्यू झाला आणि 10 जण जखमी झाले. बुर्किना फासोच्या दिशेने जाणारी बस देशाच्या दक्षिण-पूर्व भागात असलेल्या पुलावरून पडल्याने हा अपघात झाला.

मंत्रालयाने पुढे सांगितले की, बागो नदी ओलांडणाऱ्या पुलावर सायंकाळी 5 वाजता हा अपघात झाला.या अपघातामागील संभाव्य कारण चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. माळी येथे वारंवार रस्ते अपघात होत असतात हे विशेष. देशातील अनेक रस्ते, महामार्ग आणि वाहनांची दुरवस्था झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, मध्य माली येथे राजधानी बामाकोकडे जाणारी बस एका ट्रकला धडकल्याने 15 लोक ठार आणि 46 जखमी झाले. दोन्ही वाहने विरुद्ध दिशेने जात होती.