मुंबई – रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आज सकाळी युक्रेनविरुद्ध युद्ध घोषित केले आहे Russia declares war on Ukraine. युद्धाच्या अंदाजाने शेअर बाजारातील गुंतवणूकदार आधीच धास्तावले असून गुरुवारी सकाळीच शेअर share market बाजारामध्ये मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.
युक्रेन आणि रशियाच्या तणावामुळे आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. युक्रेन-रशिया संकटामुळे जागतिक बाजारपेठेचे नुकसान झाले आहे, जे भारतीय बाजारपेठेतही स्पष्टपणे दिसून येत आहे. देशांतर्गत शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 1813 अंकांच्या जबरदस्त घसरणीसह 55,418 वर उघडला. तर निफ्टी 514 अंकांच्या घसरणीसह 16,548 वर उघडला आहे.
भारतीय बाजारात सतत घसरण – याआधी बुधवारी देशांतर्गत शेअर बाजाराने चांगली सुरुवात केली, मात्र संध्याकाळपर्यंत शेअर बाजारामध्ये गती कमी होत गेली. दिवसभराचा व्यवहार संपल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही तोट्यात होते. व्यवहार संपला तेव्हा सेन्सेक्स 68.62 अंकांनी (0.12 टक्के) घसरून 57,232.06 अंकांवर होता. NSE निफ्टी देखील 28.95 अंकांच्या (0.17 टक्के) घसरणीसह 17,063.25 वर होता. अशाप्रकारे सलग सहाव्या दिवशी बाजार बंद झाला.