सांगोल्यात PSI अधिकाऱ्याच्या खुनाने खळबळ

0
WhatsApp Group

सोलापूरच्या सांगोला तालुक्यामध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सूरज चंदनशिवे असं या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.काल रात्री (2 ऑगस्ट) रात्री जेवल्यानंतर ते शेतामधून शतपावलीसाठी रस्त्यावर गेले असता मारेकऱ्यांनी त्यांची धारदार शस्त्राने हत्या केली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी घटनास्थळी दाखल झाले. त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून सांगोला ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.