
सावंतवाडी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते Congress leader विकास सावंत यांचे आज निधन झाले Vikas Sawant passes away . ते ६२ वर्षाचे होते.दोन तासापूर्वी ते माजगाव येथील निवासस्थानी मृच्छीतावस्थेत आढळून आले.
त्यांना अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत डॉ.अभिजीत चितारी यांनी दुजोरा दिला आहे.
काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ते परिचित होते. त्यांनी जिल्हा बँक संचालक, शिखर बँक संचालक, पतपेढी तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशी अनेक पदे भूषवली होती
सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूल, शांती निकेतन सारख्या अनेक शैक्षणिक संस्थांवर ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.त्यांनी आपल्या काळात काँग्रेसला उभारी देण्यासाठी प्रयत्न केले. जीवनाच्या अखेरपर्यंत ते काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते म्हणून राहिले.