
कॉंग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री हुसेन दलवाई यांच निधन झालं आहे. नुकतच त्यांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केले होते. दलवाई हे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मतदार संघातून चार वेळा विधानसभेवर निवडून आले होते.
तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी कायदा, राजशिष्टाचार, बंदरे मंत्री म्हणून यशस्वी पणे जबाबदारी संभाळली होती. दलवाई यांना स्व. यशवंतराव चव्हाण व वसंतदादा पाटील यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते.
17 ऑगस्ट 1922 ला त्यांचा चिपळूण मध्ये जन्म झाला. कोकणातील सुरुवातीच्या काळातील मोजक्या वकिलांमध्ये त्यांचा समावेश होता. कॉंग्रेस पक्षाकडून विधानसभेमध्ये आमदार, राज्यसभेत व लोकसभेत खासदार व राज्यात मंत्री अशी त्यांची राजकीय दिमाखदार कामगिरी राहिली आहे.