
ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मराठी रंगभूमीवरील नटसम्राट अशी त्यांची ओळख होती. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मोहनदास सुखटणकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे.
रायगडाला जेव्हा जाग येते, लेकुरे उदंड झाली, अखेरचा सवाल, दुर्गा, स्पर्श, आभाळाचे रंग आणि मस्त्यगंधा या नाटकांमध्ये त्यांमी काम केलं आहे. नाटकांप्रमाणेच त्यांनी ‘कैवारी’, ‘जावई माझा भला’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘थोरली जाऊ’, ‘वाट पाहते पुनवेची’, ‘जन्मदाता’, ‘पोरका’, ‘प्रेमांकुर’, ‘निवडुंग’ या मराठी चित्रपटांतही काम केले आहे.