स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे अभिवादन

WhatsApp Group

मुंबई : स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या १० व्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनात त्यांच्या प्रतिमेस विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

यावेळी विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ.राजेन्द्र भागवत, उपसभापतींचे खाजगी सचिव रविंद्र खेबुडकर, उपसचिव श्री. तारवी, स्वीय सहायक कौस्तुभ खांडेकर यांनीही पुष्प अर्पण करून दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली.