
आत्मविश्वास ही एक मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती आहे. आत्मविश्वास हा आपल्या जीवनातील यशाची गुरुकिल्ली आहे. जसा आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजन आणि माशांसाठी पाणी महत्त्वाचे आहे तसाच आत्मविश्वास आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आत्मविश्वास ही ऊर्जा आहे जी यश मिळवून देते अडथळे, अडचणी आणि अडचणींना तोंड देण्यासाठी व्यक्ती धैर्य देते. त्यामुळे दररोज आत्मविश्वास वाढवणारे सुविचार आपण वाचले पाहिजे.
म्हणूनच या लेखात आम्ही तुमच्यासाठी आत्मविश्वास सुविचार मराठी (self confidence suvichar marathi) घेऊन आलो आहोत, ते नक्कीच तुम्हाला आवडतील.
- अपयश हे यशाच्या विरुद्ध नाही, तर यशाचा एक भाग आहे. त्यामुळे हार मानू नका.
- काही वेळा स्वतःला प्रेरित करण्यासाठी फक्त तीनच शब्दांची गरज असते. ‘हो, मी करू शकतो.
- यशाची महत्त्वाची गुरुकिल्ली म्हणजे ‘आत्मविश्वास’ आणि आत्मविश्वासाची महत्त्वाची गुरुकिल्ली म्हणजे उत्तम ‘तयारी’.
- जीवनात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला स्वत:वर विश्वास असणे आवश्यक आहे.
- जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुमच्या स्वप्नांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही.
- नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा, स्वप्ने नक्कीच पूर्ण होतील.
- खरं तर, आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. आत्मविश्वासामुळेच आपल्याला यश मिळेल याची जाणीव अनेकांना नसते.
- आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे. समाधान हा सर्वात मोठा खजिना आहे. आत्मविश्वास हा सर्वात मोठा मित्र आहे.
- अभिमान, निष्ठा, शिस्त, हृदय आणि मन याशिवाय आत्मविश्वास ही सर्व कुलूपांची गुरुकिल्ली आहे.
- तुम्ही एकटे चालण्याचे धाडस करा. देव हजार मार्ग द्यायला तयार आहे. फक्त तुम्ही स्वत:वर विश्वास ठेवा.
विद्यार्थ्यांनी हे सुविचार नेहेमी वाचावे. कारण विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार वाचून एक ऊर्जा येते, आणि यश मिळवण्यास ताकद देते.
- जगातील सर्वात चांगला दागिना म्हणजे “परिश्रम” आणि सर्वोत्तम आयुष्याचा जोडीदार म्हणजे ‘आत्मविश्वास’.
- स्वतःवर विश्वास ठेवा! आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा! तुमचा तुमच्या सामर्थ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही यशस्वी किंवा आनंदी होऊ शकत नाही.
- जेव्हा तुम्ही थकाल, विश्रांती घ्या पण हार कधीच मानू नका.
- आजचा दिवस वाईट आहे, कदाचित उद्या चांगला असेल. ही वेळ आहे, थांबणार थोडीच आहे!
- आत्मविश्वास असला की मग तुम्ही सुरुवात करण्यापूर्वीच आर्धी लढाई जिंकलेले असतात!!
- जसा तुमचा आत्मविश्वास आहे, तशीच आपली ‘क्षमता’ बनते.
- एक हार झाल्यामुळे कोणी फ़कीर होत नाही आणि एकदा जिंकल्यामुळे कोणी सिकंदर होत नाही.
- जर तुम्हाला स्वतःवर विश्वास असेल तुटलेले जीवन पुन्हा फुलू शकतो
- यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!
- यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याच भल झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे.
आत्मविश्वास अशी गोष्ट आहे जी अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करण्याची ताकद ठेवते, फक्त स्वतःवर आत्मविश्वास हवा, जसे लहान मुलाला आईच्या दुधाची आवश्यकता असते, एखाद्या रोपट्याला जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, त्याच प्रमाणे जिंकण्यासाठी आत्मविश्वास असणे गरजेचे असते.
- चमचा ज्या भांडयात राहतो त्याच भांडयाला रिकामा करतो म्हणून चमच्यांपासुन सावध रहा….
- लोकांचे सल्ले घ्या कारण ते फुकट असतात, निर्णय मात्र स्वतःचे घ्या कारण ते अमूल्य असतात.
- तुम्ही आर्थिकदृष्ट्या गरीब असलात तरी हरकत नाही, पण मानसिकतेने गरीब राहू नका
- गंजून संपण्यापेक्षा झिंजून संपलेलं केव्हाही चांगले..!
- माफी मागून छोट व्हा पण खोटं बोलून कधीच मोठं होऊ नका..!
- एक लक्षात ठेवा नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नसते मेहनत करूनच उघडावे लागते.
- स्वतःचे मन जिंकणे हे हजारो युद्ध जिंकण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे.
- काही वेळा स्वतःला प्रेरित करण्यासाठी फक्त तीनच शब्दांची गरज असते. ‘हो, मी करू शकतो.’
- माईंडसेट असा पाहिजे कि मला जे जमतं ते मी करणारचं, आणि जे मला जमत नाही ते मी शिकणारचं.!
- पूल आणि भींत दोन्ही बनवायला एक सारखाच साहित्य लागत, पण पुल लोकांना जोडायच काम करतो.., आणि भिंत वेगळ करायच काम करते..
विश्वासाचच दुसरं नाव भगवंत आहे कारण दगडाच्या मूर्तीत आपण ईश्वराला पाहतो. आपल्याला विश्वास आहे की तो ईश्वर आपल्या नेहमी सोबत आहे आपल्याला कोणत्याही प्रकारची हानी तो होऊ देणार नाही, म्हणून एकमेकांच्या विश्वासाला जपा विश्वासाला जपाल तर देव पण खुश होईल.
- संघर्ष जेवढा कठीण होईल, विजय तेवढाच तल्लख होईल.
- दान दिल्यावर जे लक्षात राहत नाही तेच खरं दान
- संयमी रहा. काही गोष्टी वेळ घेतात.
- दोष लपावला की मोठा होतो आणि कबुल केला की नाहीसा होतो.
- आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फ़ार दूर्मिळ असते.
- क्षमा वृत्ती ठेवून जग जिंकावा.
- शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.
- प्रेमाचा उत्तम पुरावा विश्वास आहे.
- ज्यांच्या कडून काही आशा नाही, बहुतेकदा तेच लोक चमत्कार करतात!
- स्वतःची वाट स्वताच बनवा कारण इथे लोक वाट दाखवायला नाही वाट लावायला बसलेत.
जीवनात स्वतःवर असलेला Self Confidence सर्वात महत्वाचा आहे. जर तुमच्या जवळ आत्मविश्वास असेल तर तुम्ही कोणतीही अडचण पार करू शकता.
- क्षमतेपेक्षा जास्त धावल की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो.
- मोठा माणूस तोच जो आपल्या सोबतच्याना छोटा समजत नाही.
- विश्वास ठेवा, पण पडताळा.
- वेळ जाण्याआधी वेळेची किंमत ओळखा.
- यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती – आत्मविश्वास.
- यश म्हणजे जेथे तयारी आणि संधी मिळतात.
- आपले ध्येय उच्च ठेवा आणि ते प्राप्त करेपर्यंत थांबु नका.
- विचार करा, काळजी करू नका, नवीन कल्पनांना जन्म द्या.
- कष्ट इतके शांततेत करा कि तुमचे यश धिंगाणा घालेल.
- जो पर्यंत नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही ,तोपर्यंत सर्व काही शक्य आहे.
छत्री पाऊस थांबवू शकत नाही पण तो तुम्हाला पावसात देखील पुढे जाण्यासाठी मदत करतो तसेच, आत्मविश्वास देखील तुम्हाला यश मिळवून देत नाही पण तो तुम्हाला कठीण काळातून बाहेर निघायला मदत करतो.
- मोठा माणूस तोच जो आपल्या सोबतच्याना छोटा समजत नाही.
- चुका आणि अपयश हा प्रगतीचा भाग असतो.
- संयम हा खुप कडवट असतो पण त्याच फळ फार गोड असते.
- उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.
- एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येऊ शकत नाही.
- यश तुमच्याकडे येणार नाही! त्याऐवजी आपण स्वतः त्याकडे जावे लागेल !!
- स्वताचे घर गळत आसताना पण पावसाची आपेक्षा करतो तो शेतकरी.
- स्मितहास्य ही अशी वक्ररेशा आहे जी अनेक गोष्टी सरळ करते.
- चुकलात तरच प्रगती कराल.
- खरी स्वप्ने तीच असतात जी तुम्हाला झोपु देत नाहीत.