आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारे ‘हे’ 5 खेळाडू

WhatsApp Group

सचिन तेंडुलकरनंतर विक्रमांचा बादशाहा म्हणून विराट कोहली ओळखला जातो. विराटने हे वेळोवेळी सिद्ध देखील केले आहे. टेस्ट असो वनडे असो की टी-20, विराट एका मागून एक विक्रम करत पुढे चालला आहे. याला आयपीएल तरी कसे अपवाद असेल? आयपीएलच्या बहुतांश विक्रमांच्या यादीमध्ये देखील विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. आज आपण जाणून घेऊयात आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या most runs in ipl यादीत कोणत्या खेळाडूंचा समावेश आहे.

1.विराट कोहली (6411धावा)  – आयपीएलमध्ये आजवर सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट पहिल्या क्रमांकावर आहे. आयपीएलमध्ये 6,000 धावा पूर्ण करणारा विराट कोहली हा पहिला खेळाडू ठरला होता. त्याने 216 आयपीएल सामन्यांमध्ये 6411 धावा केल्या आहेत.

2.शिखर धवन (6086 धावा) – आयपीएलमध्ये 6000 धावा करणारा धवन हा दुसरा फलंदाज आहे. आयपीएल 2022 च्या 38 व्या सामन्यात पंजाब किंग्जचा फलंदाज शिखर धवनने ही मोठी कामगिरी केली आहे. धवनने आयपीएलमध्ये 6,000 धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने 200 आयपीएल सामन्यांमध्ये 6086 धावा केल्या आहेत.

3.रोहित शर्मा (5764 धावा) – या यादीत तिसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा येतो. रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला 5 विजेतेपद जिंकवून दिले आहे. त्याने 221 सामन्यांमध्ये 5,764 धावा केल्या आहेत.

4.डेव्हिड वॉर्नर ( 5668 धावा) – या यादीत चौथ्या क्रमांकावर स्फोटक बॅट्समन डेव्हिड वॉर्नर हा आहे. सातत्याने ऑरेंज कॅपचा विजेता ठरणारा वॉर्नर या यादीत असणे स्वाभाविक आहे. त्याने 155 आयपीएल सामन्यांमध्ये 5,668 धावा केल्या आहेत.

5.सुरेश रैना ( 5528 धावा) – या यादीत पाचव्या क्रमांकावर मिस्टर आयपीएल सुरेश रैना येतो. रैनाने आजवर 205 सामन्यांमध्ये 5,528 धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका शतकाचा आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे. सुरेश रैना आयपीएलमध्ये 5,000 धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरला होता.