
७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे तीन पुरस्कार समाविष्ट आहेत. आज हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
राज्यातील महाराष्ट्रातील तीन जणांना पद्मश्री पुरस्कारासाठी घोषित करण्यात आले आहे. ज्यामध्ये लेखक मारुती चितमपल्ली, वन्यजीव संवर्धन क्षेत्रात मोठे योगदान देणारे चैत्रम पवार आणि प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांचा समावेश आहे.
पद्म पुरस्काराची यादी
हरिमन शर्मा, जुम्दे योमगम गॅमलिन, जॉयनाचरण बथारी, नरेन गुरुंग, विलास डांगरे, सैखा एझ अल सबा, निर्मला देवी, भीम सिंग भावेश, राधा बहन भट्ट, सुरेश सोनी, पंडी राम मानवी, जोनास मासेट्टी, जगदीश जोशिला, हरविंदर सिंग, भेरू सिंह चौहान, वेंकप्पा अंबाजी सुगतकर, पी दच्चनामूर्ती, निरजा भाटला, मारुती भुजंगराव चितमपल्ली, भीमव्वा दोड्डाबलप्पा सिल्कायतारा, सॅली होळकर, गोकुळ चंद्र दास, चैत्राम पवार यांना हा पुसस्कार जाहीर झाला आहे.