बिजापूर जिल्ह्यातील करेगुट्टा टेकड्यांजवळ सुरक्षा दलांना मोठे यश, 15 नक्षलवादी ठार

WhatsApp Group

बिजापूर: छत्तीसगडच्या बिजापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील बिजापूर जिल्ह्यातील करेगुट्टा टेकड्यांजवळ सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी १५ हून अधिक नक्षलवाद्यांना ठार मारले आहे, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. मिशन संकल्प अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

एप्रिलमध्येही याच जंगलात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी मारले गेले होते. छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील करेगुट्टाच्या टेकड्यांवर सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेचा उद्देश नक्षलवाद संपवणे आहे.