![WhatsApp Group WhatsApp Group](https://insidemarathi.com/wp-content/uploads/2023/03/WhatsApp-Add.gif)
मुंबई – राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील कायदा व व्यवस्था अबाधित राहावी यासाठी आजपासून 10 जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी परिपत्रक जारी केले आहे.
मुंबई पोलीस आयुक्त तसेच कायदा व सुव्यवस्थेचे उपायुक्त आणि पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये राज्यातील सध्याच्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीअंती शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारी म्हणून 10 जुलैपर्यंत कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेतला.