Video : तैवानमध्ये 24 तासांत दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के, रेल्वेचे डबे उलटले, घरेही उद्ध्वस्त

WhatsApp Group

तैवानमध्ये रविवारी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. गेल्या 24 तासांत येथे दुसऱ्यांदा भूकंप झाला आहे. भूकंपाची तीव्रता 7.2 रिश्टर स्केल असून उजिंग जिल्ह्याला त्याचा फटका बसला आहे. याआधी शनिवारीही येथे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. आग्नेय तैवानला 6.9 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्यामुळे येथे एक इमारत कोसळून रस्ते खचले होते.

भूकंपामुळे अनेक घरांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय भूकंपामुळे रेल्वेचे काही डबे उलटल्याची घटनाही समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून येथे सातत्याने भूकंपाचे धक्के येत आहेत. 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप युजिंगपासून 85 किमी पूर्वेला दुपारी 12:14 वाजता झाला.

त्याचवेळी, तैवानच्या अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, युली येथील एका इमारतीतून चार जणांची सुटका करण्यात आली आहे. तैवान रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व तैवानमधील डोंगली स्टेशनवर ट्रेनचे सहा डबे रुळावरून घसरले. मात्र, यात कोणीही जखमी झाले नसल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. त्याच वेळी, सुमारे 600 लोक सिनिक चीक आणि लियुशिशी पर्वतीय भागात अडकले आहेत. येथे अग्निशमन विभाग अडवलेले रस्ते मोकळे करण्याचा प्रयत्न करत आहे.

शनिवारी संध्याकाळी आग्नेय तैवानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. एपी या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.4 इतकी नोंदवण्यात आली. भूकंपामुळे आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने या भूकंपाची तीव्रता 6.6 इतकी नोंदवली आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने सांगितले की भूकंपाचे केंद्र ताइतुंग काउंटीमधील गुआनशान टाउनशिपजवळ 10 किलोमीटर (6.2 मैल) खोलीवर होते.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा