WI vs SCO: स्कॉटलंडने केला वेस्ट इंडिजचा पराभव; विंडीजचे फलंदाज पूर्ण 20 षटकेही खेळू शकले नाहीत

WhatsApp Group

WI vs SCO: T20 विश्वचषक 2022 मध्ये आणखी एक मोठा गोंधळ झाला आहे. येथे स्कॉटलंडने दोन वेळा T20 विश्वचषक विजेत्या वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. या सामन्यात संपूर्ण वेळ स्कॉटलंडच्या संघाने वर्चस्व गाजवले. वेस्ट इंडिजचा संघ स्कॉटलंडला कोणतीही स्पर्धा देऊ शकत नाही, अशी स्थिती होती. विंडीजचा संघ हा सामना 42 धावांनी हरला.

T20 विश्वचषक 2022 च्या दुस-या दिवशी तिसर्‍या सामन्यात स्कॉटलंडचा संघ दोन वेळचा चॅम्पियन वेस्ट इंडिजसमोर होता. या सामन्यत स्कॉटलंडने वेस्ट इंडिजचा 42 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने 20 षटकांत 5 बाद 160 धावा केल्या, पण प्रत्युत्तरात फलंदाजीसाठी उतरलेल्या वेस्ट इंडिजचा डाव 18.3 षटकांत अवघ्या 118 धावांत गारद झाला. अशाप्रकारे स्कॉटलंडने हा सामना 42 धावांनी जिंकला. स्कॉटलंडचा फलंदाज जॉर्ज मुन्शीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. जॉर्ज मुन्शीने 53 चेंडूत नाबाद 66 धावा केल्या.