T20 WC: स्कॉटलँडचा संघ ‘सुपर 12’ फेरीमध्ये दाखल!

WhatsApp Group

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीतील ‘ब’ गटातून कोणते 2 संघ ‘सुपर 12’ फेरीमध्ये जातील हे स्पष्ट झाले आहे. ‘ब’ गटातील सर्व सामने संपले असून स्कॉटलँडच्या संघाने पहिलं तर बांगलादेश संघाने दुसरं स्थान मिळवलं आहे.

‘अ’ आणि ‘ब’ गटात पहिल्या स्थानी असणारे 2 संघ हे ‘सुपर 12’ फेरीसाठी पात्र ठरणार होते. त्यानुसार स्कॉटलँडच्या आणि बांगलादेश संघाचे विश्वचषकातील आव्हान जिंवत राहीलं आहे. ‘ब’ गटातून स्कॉटलँडचा संघ ‘सुपर 12’ मध्ये ‘गट 1’ मध्ये जाईल तर बांगलादेशचा संघ ‘गट 2’ मध्ये जाईल. तर ‘ब’ गटातील ओमान आणि पापुआ न्यू गिनी हे संघ बाहेर पडले आहेत.

बांगलादेशने ‘ब’ गटाच्या आपल्या शेवटच्या सामन्यात पापुआ न्यु गिनीवर 84 धावांनी मोठा विजय मिळवला तर स्कॉटलँडने आपल्या शेवटच्या सामन्यात ओमानवर 8 गडी राखून विजय मिळवला आहे.

ग्रुप बीच्या शीर्षस्थानी राहिल्यामुळे स्कॉटलंड पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानसह भारताच्या गटात सामील होईल. तर दुसरीकडे, बांगलादेशचा संघ ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंडच्या गटात सामील होईल.

‘ब’ गटात तुलनेत बलाढ्य असलेल्या बांगलादेशला त्यांच्या पात्रता फेरीतील पहिल्यात सामन्यात स्कॉटलंडकडून धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र नंतरच्या दोन्ही सामन्यात झोकात पुनरागमन करून बांगलादेशने दोन्ही सामने मोठया फरकाने जिंकले. या दोन्ही विजयी सामन्यात बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन हिरो ठरला. त्याने फलंदाजीसोबत गोलंदाजीतही आपला खेळ उंचवलाय. त्यामुळे ‘सुपर 12’ मध्ये गट 2 च्या बाकी संघांना त्याच्यापासून सावध राहावे लागणार आहे.