राज्यात ‘या’ दिवसापासून शाळा पुन्हा चालू होणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय!

WhatsApp Group

मुंबई – कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्य सरकारने राज्यातील सर्व शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयावरुन विद्यार्थी आणि पालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. विद्यार्थी पालकांसह शिक्षकांकडून देखील या निर्णयावर नाराजी व्यक्त केली जात होती. या नाराजीमुळे ठाकरे सरकारने सोमवारपासून शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे School Reopen in Maharashtra.

राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात विद्यार्थी पालकांसह शिक्षकांनीही सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे. नियोजन करून शाळा सुरू कराव्यात अशी मागणी शिक्षकांकडून केली जातं आहे. त्यामुळे आता शाळा सुरू करण्याबाबत सरकार हा निर्णय घेतला आहे.


वर्षा गायकवाड माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, शिक्षणतज्ज्ञ आणि पालक संघटनांशी चर्चा झाली त्यावेळी आम्हाला निवेदन प्राप्त झाली होकी. त्या निवेदनांमध्ये शाळा सुरू कराव्या असं सर्वांचं म्हणणं होतं. पण मधल्या काळात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ झाली त्यामुळे राज्य सरकारने शाळा आणि महाविद्यालये सुरू करू नये असा निर्णय घेतला होता. मात्र आता पुन्हा शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे.

ज्या भागांत रुग्णसंख्या कमी असेल तिथे स्थानिक पातळीवर निर्णयाचे अधिकार द्यावेत असा मुद्दा मांडण्यात आला होता. त्यानुसार  मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर केला होता. येत्या सोमवारपासून शाळा सुरू करण्याबाबत विचार करावा असं प्रस्तावात सांगण्यात आले आहे. या प्रस्तावास आता मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे.