हवामान विभागातर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्याला देण्यात आलेल्या अलर्टच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या, शुक्रवारी 20 जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांच्या सूचनेनुसार ही सुट्टी जारी करण्यात आली आहे. गेल्या 3 होत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि पुढील दिवसांच्या पावसाच्या अंदाजानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.