Maharashtra School : सुट्टी संपली….! राज्यभरातील शाळा आजपासून सुरु, विदर्भात मात्र 27 जूनपर्यंत वाट पाहावी लागणार

WhatsApp Group

मुंबई – राज्यभरात आजपासून म्हणजेच 13 जूनपासून शाळा सुरु झाल्या आहेत. शिक्षण विभागाने यासंदर्भात माहिती देत शाळा सुरु होण्याची तारीख जाहीर केली. देशात कोरोनाचा प्रदुर्भाव गेल्या दोन अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरु आहे. त्यामुळे शाळा आणि कॉलेजेस (School and colleges) बंद करण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या (Online education) माध्यमातून शिक्षण देण्यात येतं होतं. मात्र गेल्या काही महिन्यांमधील कोरोनाची समाधानकारक स्थिती पाहता हळूहळू शाळा आणि कॉलेजेस सुरु करण्यात आल्या आहेत.

त्यानुसार शाळांमध्ये उन्हाळी परीक्षाही घेण्यात आल्या आहेत. त्यात आता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळा पुन्हा सुरु (Maharashtra school reopen) होणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यानुसार आजपासून राज्यातल्या शाळा सुरु होत आहेत. राज्यभरातील शाळा 13 जूनपासून सुरु होणार असल्या तरी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष 15 जूनपासूनच बोलावले जाणार आहे.