
परभणीच्या गंगाखेड शहरातील संत जनाबाई विद्यालयाच्या स्कूल बसचा आणि एसटी बसची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 20 पेक्षा अधिक जण जखमी झाले असून त्यांना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर चार जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे नेण्यात आलं आहे. हा भीषण अपघात गंगाखेड सावरगाव रोडवरील खंडाळी गावाजवळ झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपळदरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आहेत.