Scholarship exams : अतिवृष्टीमुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

WhatsApp Group

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या (आठवी) तारखा बदलण्यात आल्या असून आता 20 जुलै ऐवजी 31 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार आहेत.

या परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 20 जुलै रोजी एकाच दिवशी घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पुरसदृश्य स्थिती व बहुतांश ठिकाणी भुस्खलनामुळे वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणी, विद्यार्थी हित व त्यांची सुरक्षा लक्षात घेता परीक्षा रविवारी 31 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार आहे.

परीक्षेसाठी यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र 31 जुलै च्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल,असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी कळविले आहे.