‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठी देखील एक योजना आणली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. मुख्यंमंत्र्यांनी ‘लाडका भाऊ’ योजना जाहीर केली . या योजनेअंतर्गत 12 वी पास झालेल्या तरूणांना दरमहा 6 हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8 हजार रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना 10 हजार स्टायपेंड देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेद्वारे बेरोजगारीवर उपाय शोधून काढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.
अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ ही योजना जाहीर करण्यात आली होती. त्याअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. बहिणींसाठी योजना, मग लाडक्या भावांसाठी काय, असा प्रश्न विरोधकांनी त्यावर उपस्थित केला होता. मात्र आता राज्य सरकारने लाडक्या भावांसाठीदेखील योजना आणली आहे.
या योजनेतील तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप करेल, त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल. या योजनेनुसार राज्यातील तरुण ज्या कारखान्यात काम करतील अप्रेन्टिसशिप करतील तिथे त्यांच्यासाठी आपलं सरकार पैसे भरणार आहे. त्याचबरोबर त्यांना स्टायपंड देईल. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशा प्रकारची योजना आणली आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
लाडका भाऊ योजनेचा फायदा कुणाला?
12 वी उत्तीर्ण – दरमहा 6 हजार रुपये
डिप्लोमा झालेला तरुण – दरमहा 10 हजार रुपये
पदवीधर तरुण – दरमहा 10 हजार रुपये
‘लाडका भाऊ योजने’साठी पात्रता काय?
– या योजनेसाठी फक्त महाराष्ट्रातील तरुण पात्र आहेत.
– या तरुणांचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे
– शैक्षणिक पात्रतेचे 12 वी पास, डिप्लोमा, पदवीधर असे 3 गट आहेत
– शिक्षण सुरु असणाऱ्या तरुणांना योजनेचा लाभ घेता येणार नाही
– बेरोजगार तरुणांनाच या योजनेचा फायदा मिळेल
– अर्जदारचे बँक खाते आधारकार्डशी संलग्न असावे
– इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर नोंदणी