T20 World Cup 2022 Schedule: सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, ‘हे’ दोन संघ भारताविरुद्ध भिडतील

WhatsApp Group

ICC T20 विश्वचषकाच्या सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 10 ते 19 ऑक्टोबर दरम्यान एकूण 15 सराव सामने खेळवले जाणार आहेत. या काळात भारताला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा सामना करावा लागणार आहे. भारताचा पहिला सराव सामना 17 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि त्यानंतर 19 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.

वेस्ट इंडिज, यूएई, स्कॉटलंड, नेदरलँड, श्रीलंका, झिम्बाब्वे, नामिबिया, आयर्लंड हे संघ पहिल्या फेरीत खेळतील. ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश डायरेक्ट सुपर-12 मध्ये खेळतील.

भारताला त्यांचे दोन्ही सराव सामने गाबा येथे खेळायचे आहेत, पहिला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 17 ऑक्टोबरला आणि दुसरा न्यूझीलंडविरुद्ध 19 ऑक्टोबरला. पाकिस्तानला 17 आणि 19 ऑक्टोबरला इंग्लंड आणि अफगाणिस्तानविरुद्ध सराव सामने खेळायचे आहेत.