
भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट टर्म लोन सुरू केले आहे. भारत आणि परदेशातील शिक्षण घेणारे विद्यार्थी या कर्जासाठी अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत, यूजी, पीजी आणि आयआयटी, आयआयएम सारख्या काही स्वायत्त संस्थांच्या डिप्लोमा कोर्ससाठी ५० लाखांपर्यंतचे कर्ज देखील घेतले जाऊ शकते. याशिवाय एमसीए, एमबीए, एमएस इत्यादी रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांसाठी परदेशातील नामांकित संस्थांमधून जास्तीत जास्त १.५ कोटी कर्जाचा अर्ज करता येतो.
कोर्सनंतर १५ वर्षांत कर्जाची परतफेड होते अभ्यास पूर्ण झाल्यानंतर कर्जाची रक्कम जास्तीत जास्त १५वर्षांच्या कालावधीत परत केली जाऊ शकते. व्याजदर ८.६५ टक्के आहे. मुलींना व्याजदरात ०.५ टक्के सूट मिळेल. तसंच, २० लाखांपर्यंत कोणतेही प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही. २० लाखांपेक्षा जास्त रकमेवर १०,००० रुपयांच्या प्रोसेसिंग फीसह कर भरावा लागेल. ४लाखांपर्यंतच्या रकमेसाठी मार्जिन पेमेंटची आवश्यकता नाही.
अधिक माहितीसाठी वेबसाइटला भेट द्या- https://sbi.co.in/web/personal-banking/loans/education-loans/student-loan-scheme