SBI च्या ग्राहकांनो सावधान, वेळीच बघा नाहीतर होईल पश्चाताप!

WhatsApp Group

आजच्या ऑनलाइन काळात बँकिंग क्षेत्रही मोबाईलवर अवलंबून झाले आहे. सर्वात मोठा व्यवहार (Money Transfer) असो किंवा घरबसल्या खरेदी असो, आता सर्व काही मोबाईलवर करता येते. अशा काळात सायबर फसवणुकीचा (Cyber Fraud) धोकाही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे.

अनेक फसवणूक करणारे लोक बँकर असल्याचे भासवून ग्राहकांना फोन करतात. यानंतर त्यांना आमिष दाखवून ओटीपी वगैरे मागतात. अशा प्रकरणांमध्ये वाढ होत असल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या करोडो ग्राहकांना सतर्क केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने नुकतेच एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये बँकेने आपल्या करोडो ग्राहकांना सावध केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत ट्विटर हँडलने ट्विट केले आहे की, ‘कोणतीही गोष्ट शेअर करणे ही देखभाल आहे. पण, जेव्हा OTP येतो तेव्हा तो कधीही इतर कोणालाही सांगू नका.

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना नेहमीच फसवणुकीच्या घटनांबद्दल सतर्क ठेवते. गेल्या काही वर्षांत बँकिंग व्यवस्थेमध्ये मोठे बदल झाले आहेत. सध्याच्या काळात लोक शाखेत जाण्याऐवजी घरी बसून नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादींचा वापर करण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.

व्यवहारात फसवणुक करणारे गुन्हेगार वेगवेगळ्या मार्गाने लोकांना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे याबाबत आपल्या 44 कोटी ग्राहकांना सतर्क करण्यासाठी बँकेने अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले आहे.