सयाजी शिंदे यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया

WhatsApp Group

मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारे लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साताऱ्यामध्ये (Satara) त्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया पार पडली आहे.  काल छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. सयाजी शिंदे यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.