
शिवसेना नेते दीपक केसरकर हे एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याची माहिती समोर आली आहे. गुवाहाटीमध्ये केसरकर दाखल झाले आहेत. अख्खी शिवसेना आता शिंदेंच्या बाजूने असल्याचंही सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदेयांच्याकडे 37 पेक्षा जास्त आमदार असल्याचं बोललं जातंय. आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र ते राज्यपालांना देणार असल्याची शक्यता आहे. एक एक करून अनेक आमदार शिंदे गटात जात आहेत.
महाविकास आघाडी सरकारमधील सहा मंत्री देखील शिंदे गटाला मिळाले आहेत. यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता दोन तृतीआंश शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे आता पक्षांतर बंदी कायद्याचा कोणताही परिणाम शिंदे यांच्यावर होणार नाही, हेही आता स्पष्ट आहे.