Vijay Hazare Trophy 2022: महाराष्ट्राचा 5 गडी राखून पराभव करत सौराष्ट्रने 14 वर्षांनंतर विजेतेपदावर केला कब्जा
सौराष्ट्रने 14 वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. सौराष्ट्राने महाराष्ट्राविरुद्धचा सामना 5 विकेट्सने जिंकला आहे. सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या महाराष्ट्र संघाने 50 षटकांत 9 गडी गमावून 248 धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना सौराष्ट्र संघाने 46.3 षटकांत 5 गडी गमावून लक्ष्य गाठले. शेल्डन जॅक्सनने फलंदाजी करताना सौराष्ट्रकडून शतक झळकावले.
या सामन्यात सौराष्ट्राचा फलंदाज शेल्डन जॅक्सनने 136 चेंडूत 133 धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या खेळीमुळे संघाला विजय मिळवणे खूप सोपे झाले. जॅक्सनच्या खेळीत एकूण 12 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. याशिवाय सलामीवीर हार्विक देसाईने 67 चेंडूत 50 धावांची खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. याशिवाय चिराग जानीने 25 चेंडूत 30* धावा करत संघाला शेवटच्या सामन्यात साथ दिली.
WHAT. A. WIN! 🙌 🙌
Those celebrations! 👏 👏
The @JUnadkat-led Saurashtra beat the spirited Maharashtra side to bag the #VijayHazareTrophy title 🏆
Scorecard 👉 https://t.co/CGhKsFzC4g #Final | #SAUvMAH | @mastercardindia | @saucricket pic.twitter.com/2aPwxHkcPD
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 2, 2022
महाराष्ट्राचा गोलंदाज मुकेश चौधरीने 9 षटकांत 38 धावा देत 2 बळी घेतले. याशिवाय विकी ओस्तवालने शानदार गोलंदाजी करत 10 षटकात 20 धावा देत 2 बळी घेतले. त्याचवेळी सत्यजित बच्छावनेही एक विकेट घेण्यात यश मिळवले. इतर कोणत्याही गोलंदाजाला यश मिळाले नाही. यामध्ये राजवर्धन हंगरगेकर सर्वात महागडा ठरला, त्याने 9 षटकात 7.80 च्या इकॉनॉमीसह 70 धावा दिल्या.
महाराष्ट्राकडून पहिल्या डावात कर्णधार ऋतुराज गायकवाडने 131 चेंडूत 108 धावा केल्या. त्याच्या खेळीत एकूण 7 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. मात्र, त्याचे हे शतक संघासाठी कामी येऊ शकले नाही.