Satya Prem Ki Katha Trailer: सत्यप्रेम की कथा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

0
WhatsApp Group

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी अभिनीत ‘भूल भुलैया 2’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा या दोघांची जोडी ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला, ज्याला लोकांचे प्रचंड प्रेम मिळाले. टीझर रिलीज झाल्यानंतर ट्रेलरच्या घोषणेसाठी काल एक पोस्ट देखील शेअर करण्यात आली होती. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटातील ‘नसीब से’ हे पहिले गाणे काही दिवसांपूर्वी रिलीज झाले आहे. कार्तिकने त्याच्या पोस्टमध्ये ट्रेलर रिलीजच्या वेळेचाही उल्लेख केला होता. प्रतीक्षा संपली! सत्य प्रेम की कथा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)