जॉनचा ‘सत्यमेव जयते 2’ नोव्हेंबर 25 ला होणार प्रदर्शित

WhatsApp Group

मुंबई – जॉन अब्राहम स्टारर ‘सत्यमेव जयते 2’ ची रिलीज डेट पुन्हा एकदा बदलण्यात आली आहे. 26 नोव्हेंबर ऐवजी हा चित्रपट आता एक दिवस आधी म्हणजेच 25 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. इंस्टाग्रामवरून एक पोस्ट करत जॉनने ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

जॉनने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, ‘सत्यमेव जयते 2’ गुरुवारी 25 नोव्हेंबरला सिनेमागृहात येत आहे. पुन्हा एकदा चित्रपटामध्ये अ‍ॅक्शन आणि मनोरंजन पाहायला मिळेल. जॉनने हे देखील सांगितलं आहे की चित्रपटाचा ट्रेलर हा 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. जॉनने ‘सत्यमेव जयते 2’ चे नवीन मोशन पोस्टरही रिलीज केलं आहे, ज्यामध्ये तो एक दमदार पोलिसाच्या अवतारात दिसत आहे.

मिलाप झवेरी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते 2’ मध्ये भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला कुमार याही महत्वाच्या महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटात राजीव पिल्लई, साहिल वैधी आणि अनूप सोनी हे देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भाग आहेत. ‘सत्यमेव जयते 2’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाबरोबर कथाही मिलाप झवेरीने यांनीच लिहिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Divyakhoslakumar (@divyakhoslakumar)

2018 मध्ये रिलीज झालेल्या जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटाता हा सिक्वेल आहे. अभिनेता मनोज बाजपेयीने पहिल्या भागात महत्त्वाची भूमिका साकारली होती.