साताऱ्याला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला असून त्यामुळं नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. साताऱ्याच्या कोयना, पाटण भागात 3.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला.. संध्याकाळी 5 वाजून 6 मिनिटांनी हा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाकपासून 6 किलोमीटर अंतरावर होता. सुदैवानं यात कोणतंही नुकसान झालं नाही.
सातारा आणि परिसरात थंडीचा जोर वाढला आहे. येथे हिवाळ्यात थंडीचाआस्वाद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक हजेरी लावतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. यादरम्यान साताऱ्याच्या कोयना, पाटण भागात रविवारी सायंकाळी 5 वाजून 6 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाकपासून 16 किलोमीटर अंतरावर होता. तर भूकंपाची खोली जमिनीखाली 9 किलोमीटर होती. तर हा भूकंप सौम्य धक्यांचा असल्याने सुदैवानं कोणतंही नुकसान झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, कोयना धरण परिसरात रविवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास भूकंप जाणवला. जो 3.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. हा ५ रिश्टर स्केलच्या तीव्रतेच्या आत असल्याने सौम्य होता. त्यामुळे कोयना धरण आणि परिसराला या भूकंपाचा कोणताही धोका नसल्याची माहिती धरण व्यवस्थापनाच्या वतीनं देण्यात आली आहे. तसेच नागरीकांनी देखील घाबरून जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.