
Sargam Kaushal Mrs. World 2022: सरगम कौशल हिने मिसेस वर्ल्डचा किताब पटकावला आहे. या स्पर्धेत जगभरातील 63 देशांतील महिलांनी भाग घेतला होता, यात सरगम कौशलने बाजी मारली आहे. मिसेस इंडिया स्पर्धेच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर याची घोषणा करण्यात आली आहे. मुकुटाच्या क्षणाची एक झलक इथे शेअर करताना लिहिले आहे की, दीर्घ प्रतीक्षा संपली आहे. हा मुकुट 21 वर्षांनंतर परत आला आहे.
डॉ. अदिती गोवित्रीकर यांनी 21 वर्षांपूर्वी म्हणजेच 2001 मध्ये मिसेस वर्ल्डचा किताब जिंकला होता. हा ताज जिंकणारी अदिती पहिली भारतीय महिला ठरली होती. अदिती देखील एक अभिनेत्री आहे, तिने भेजा फ्राय, दे दना दान, स्माईल प्लीज सारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. अदिती 2022 च्या स्पर्धेत ज्युरी सदस्य म्हणून सामील झाली.
Sargam Koushal wins Mrs World 2022, brings crown back home after 21 years
Read @ANI Story | https://t.co/CfQrxiNQEe#SargamKoushal #mrsworld2022 pic.twitter.com/UOn4c058ZG
— ANI Digital (@ani_digital) December 18, 2022
मिसेस वर्ल्ड ही जगातील पहिली अशी सौंदर्य स्पर्धा आहे, जी विवाहित महिलांसाठी बनवण्यात आली आहे. याची सुरुवात 1984 मध्ये झाली. पूर्वी या स्पर्धेचे नाव मिसेस अमेरिका होते, जे नंतर मिसेस वुमन ऑफ द वर्ल्ड असे बदलले गेले. 1988 मध्ये याला मिसेस वर्ल्ड असे नाव देण्यात आले. मिसेस वर्ल्ड खिताब जिंकणारी पहिली महिला श्रीलंकेची रोझी सेनायाके होती.
View this post on Instagram
कोण आहे सरगम कौशल?
जम्मू-काश्मीरमधील 32 वर्षीय सरगम कौशलने इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. सरगमने विशाखापट्टणममध्ये शिक्षिका म्हणूनही काम केले आहे. सरगमचे 2018 मध्ये लग्न झाले, तिचा नवरा भारतीय नौदलात आहे.