
Sargam Kaushal Mrs. World 2022: भारताच्या मुलीने पुन्हा एकदा चमत्कार केला आहे. मुंबईतील रहिवासी असलेल्या सरगम कौशलनं मिसेस वर्ल्ड 2022 स्पर्धा जिंकून भारतीयांचा अभिमान वाढवला आहे. या स्पर्धेत 63 देशांतील स्पर्धकांचा सहभाग होता. भारताच्या या कन्येने 21 वर्षांनंतर हे विजेतेपद पटकावून देशात परत आणले आहे. 2021 मध्ये मिसेस वर्ल्ड झालेल्या अमेरिकन शायलिन फोर्डने भारताच्या सरगम कौशलचा मुकुट घातला. मिसेस पॉलिनेशियाला फर्स्ट रनर अप आणि मिसेस कॅनडाला सेकंड रनर अप म्हणून घोषित करण्यात आले आहे. मिसेस इंडिया स्पर्धेनेही त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरून विजेत्यांची घोषणा केली आहे.
View this post on Instagram