
Romana Zahoor: प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर उजव्या हाताचा फलंदाज सर्फराज खानला भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळाले आहे. त्याने गुरुवारी राजकोट कसोटीत पदार्पण केले आणि यादरम्यान त्याच्या वडिलही सोबत दिसले. मात्र सर्फराजचे वडील नौशाद यांच्यासोबत बुरख्यात एक महिला होती. सुरुवातीला सोशल मीडियावर अनेकांनी तिला सरफराजची आई मानले होते. पण प्रत्यक्षात ती त्याची आई नसून त्याची पत्नी रोमना होती. सर्फराज खानने 6 ऑगस्ट 2023 रोजी काश्मीरमधील रहिवासी रोमानाशी लग्न केले. तिचे पूर्ण नाव रोमना जहूर आहे.
सरफराज खान भारताचा 311 वा कसोटी खेळाडू ठरला आहे. सरफारजच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या क्षणी त्याचे वडील नौशाद खान आणि पत्नी रोमाना जहूर राजकोटमध्ये पोहोचले होते. रोमाना यावेळी मैदानात बुरख्यात होती. मात्र तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अनेकजण तिच्याबद्दल जाणून घेऊया.
सरफराज खानचे वडील नौशाद खान आणि पत्नी रोमाना मैदानात फारच भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. नौशाद खान यांनी मुलाची गळाभेट घेत, त्याला मिळालेल्या टोपीचं चुबन घेतलं आणि आपल्याला किती अभिमान वाटत आहे हे दाखवलं. यावेळी रोमाना जहूरलाही अश्रू आवरत नव्हते. सरफराजने तिचीही गळाभेट घेतले आणि डोळे पुसले. त्यांचा हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
#Rohit_Sharma_congratulate_#sarfaraz_Khan_s_father___wife
♥️☺️#sarfaraz pic.twitter.com/6Ws4J8DUYw— ज़िन्दगी गुलज़ार है ! (@Gulzar__sahab) February 16, 2024
Sarfaraz Khan and his wife both got emotional and crying when he gets India’s Test Cap.
– What a memorable moment for them. pic.twitter.com/GlCa0bcSQr
— CricketMAN2 (@ImTanujSingh) February 15, 2024
कोण आहे सरफराजची पत्नी रोमाना जहूर?
रोमाना जहूर ही जम्मू काश्मीरच्या शोपियान जिल्ह्याची रहिवासी आहे. रोमाना बीएससीची विद्यार्थिनी आहे. काही रिपोर्टनुसार, रोमाना जहूर ही सरफराजच्या चुलत भावाची मैत्रीण आहे. सरफराज खानने पहिल्याच भेटीत रोमाना जहूरला पसंत केलं होतं. एकदा रोमाना सरफराजच्या भावासह सामना पाहण्यासाठी आली होती. त्याचवेळी दोघांची भेट झाली होती. तेव्हाच त्याने तिच्याशी लग्न करण्याचं ठरवलं होतं. रोमानाच्या कुटुंबाने सरफराजच्या कुटुंबाकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. दोन्ही कुटुंब लग्नासाठी लगेच तयार झाले होते. सरफराज खान आणि रोमाना जहूर यांचा निकाह 6 ऑगस्ट 2023 मध्ये झाला.