रणजी ट्रॉफी २०२२-२३ क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथे 3 जानेवारीपासून मुंबई आणि तामिळनाडू यांच्यात खेळवली जात आहे. ज्यामध्ये मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जे खूप प्रभावी ठरले. तामिळनाडूचा संघ पहिल्या डावात अवघ्या १४४ धावांवर आटोपला. मात्र यानंतर मुंबईच्या फलंदाजांनी तामिळनाडूच्या गोलंदाजांची जोरदार मुसंडी मारली. जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या सरफराज खानने आणखी एक शतक झळकावले आहे. सरफराज खानचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १२ वे शतक आहे. सरफराजने याआधी रणजी ट्रॉफीच्या या मोसमात नाबाद शतक झळकावले आहे. सरफराजची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी त्याला टीम इंडियाच्या जवळ घेऊन जात आहे.
रणजी ट्रॉफीमध्ये दमदार खेळी करणारा अनकॅप्ड युवा भारतीय खेळाडू सरफराज खान याने मुंबईकडून खेळताना तामिळनाडूविरुद्ध आणखी एक शानदार शतक झळकावले. तो फलंदाजीला आला तेव्हा संघ अडचणीत सापडला होता. मुंबईने १०० धावांत ३ विकेट गमावल्या होत्या. मात्र यानंतर सरफराज खानने समंजस फलंदाजी करत डाव पुढे नेला. त्याने आपले शतकही पूर्ण केले. सर्फराजने ७३.६४ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना २२० चेंडूत १६२ धावा केल्या. ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून १९ चौकार आणि १ गगनचुंबी षटकारही दिसला आहे.
मुंबईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तनुष कोटियननेही अडचणीत सापडलेल्या संघासाठी ७१ धावांची शानदार खेळी केली. त्याने ११४ चेंडूंचा सामना केला आणि ६२.२८ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना ७१ धावा केल्या. ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून ८ चौकार आणि १ षटकारही दिसला. या सामन्यात पृथ्वी शॉ ३५, यशस्वी जैस्वाल ०, अरमान जाफर ४, कर्णधार अजिंक्य रहाणे ४२ धावा करून बाद झाले.