संत तुकाराम महाराज पालखीचे आज प्रस्थान; देहूत ३३७ व्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी

WhatsApp Group

Sant Tukaram Maharaj Palkhi Updates: जगद्गुरु संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांची पालखी आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करण्यार आहे. तुकोबांच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी देहू संस्थानकडून (Dehu Sansthan) जय्यत तयारी करण्यात आली आहे. तुकोबांच्या पालखीचा यंदा ३३७ वा पालखी सोहळा (337th Palkhi Sohala) आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तुकोबांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा सुरू होणार आहे.